Sunday 28 March 2021

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे


प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे, हे पुस्तक आहे अश्या एका व्यक्तीच ज्यांनी आपल्या जिद्दीनं आणि दृढनिश्चयानं, कुणालाही ज्ञात नसलेल्या माडिया गोंड आदिवासींना ओळख मिळवून देण्याचं आणि हि व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द डॉ. प्रकाश आमटे आहेत. अर्थात त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि इतर सहकारी तितकेच महत्वाचे. डॉक्टर साहेबांच्या भाषेत म्हणाल तर त्यांना हे यश मिळाल ते त्यांचे कार्यकर्ते होते म्हणूनच.

हि फक्त गोष्ट नव्हे तर एक अवघड कार्य हाती घेऊन त्याला मूर्त रूपात आणलेलं सत्य ‘लोक बिरादरी प्रकल्प’ आहे . हे स्वप्न खर तर बाबा आमटेंचं. ते आपल्या मुलांना सहलीला घेऊन जाण्याच्या हेतुंन त्यांना हेमलकशाला घेऊन गेलेत. तिथली परिस्थिती इतकी वाईट कि आपण इथे काम करायला हवे अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली. त्या वेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी ती जबाबदारी स्वतः घेतली आणि काम करण्याची इच्छा दर्शवली.

शब्दात परिचय देऊन ते त्यात संपूर्णपणे सांगता येतील असे बाबा आमटे आणि त्यांचे कार्य नाहीत. आनंदवन तुमच्या पैकी बऱ्याच लोकांना माहित असावं. वरोरा (जि चंद्रपूर) पासून ५ किलोमीटर च्या अंतरावर स्थित हि फक्त एक जागा नाही तर बाबांनी उभं केलेलं घर आहे. घर त्या लोकांन साठी ज्यांच्या घरच्यांनीच त्यांना स्वीकारला नाही आणि न स्वीकारण्याच कारण – कुष्ठरोग. बाबांनी केवळ या रोग्यांवर उपचार नाही केलेत. ते स्वतः त्यांच्या सोबत राहिले, त्यांना त्यांच्या आवडीचे काम शिकविल आणि आत्मनिर्भर बनविले. हे सगळं त्यांचा गमावलेला आत्मविश्वास मिळवून देण्या करीता आणि नव्याने जगण्याची उमीद देण्या करीता. अश्याच वातावरणात वाढलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांचे मोठे भाऊ डॉ. विकास आमटे.

हेमलकसा - इथे घनदाट जंगल, प्राणी, निबिड अरण्य आणि या सगळ्यांची सोबत असलेले माडिया गोंड आदिवासी. माडिया गोंड आदिवासी हे सगळ्यात मागासलेले. त्यांचा इतर जगाशी कसलाच संबंध नाही. जंगलातल्या प्राणी, पक्षी, नदी, नाले या शिवाय त्यांना कुठलेच आवाज माहिती नाही. साधे कपडे घालणं काय असता हे देखील त्यांना ठाऊक नाही. त्यांचे खानपान पण वेगळेच - कंदमुळं, शिकार करून प्राणी खान, अगदी मुंग्यांची चटणी करून खाणे - हा त्यांचा आहार. त्या मुळे अनेक रोगांना निमंत्रण असेलेले हे आदिवासी. त्यांची भाषा देखील वेगळी, ज्याचा मराठी भाषेशी कसलाच संबंध नाही. डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी अश्या परिस्थितीत काम करायचे ठरवले होते.

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे - त्या वेळी हे दोघंच तिथे डॉक्टर्स. सुरवातीला सगळे कार्यकर्ते जंगलातच राहिले. जिथे दुनिया काय हेच ठाऊक नव्हते तिथे घर कुठली आलीत. या सगळ्यांनीच अथिक परिश्रम घेतले. समोर येईल ते काम केले. नसेल येत तर ते आधी आपले आपलेच शिकून घेतले. सुरवातीला आदिवासी यांना बघून जंगलात लपायचे. ह्या माडिया लोकांत अंधश्रद्धा भरपूर. काही झाले कि मांत्रिका कडे जायचे. अनेक प्रयास केल्या नंतर या माडिया आदिवासींना थोडा विश्वास बसायला लागला होता आणि म्हणून ते डॉक्टर कडे यायचे.

कठोर परिश्रम घेतल्या नंतर आज हे प्रकल्प उभे राहू शकले. आता इथे ऑपरेशन्स देखील होतात. शाळा आहे. प्राणी संग्रालय देखील आहे. अनेक लोक आता इथे जातात.

महत्वाचे सांगायचे तर हे केवळ पुस्तक नाही. हि एक वाटचाल आहे त्या प्रत्येक व्यक्ती करीता ज्यांत इच्छा आहे लोक कल्याणा करीता काही करण्याची. हे पुस्तक आहे साधेपणाचा, जिथे आपल अस सगळं विसरून अज्ञानात असलेल्यांना प्रकाशा कडे नेण्याचं. हे पुस्तक आहे अनुभवाचं. हे फक्त आत्मचरित्र नसून एक प्रयास आहे बहुतांशी लोकां पर्यंत पोहचण्याचा.

आपल्याला सगळं मिळालं असतांना देखील आपल्या बऱ्याच तक्रारी असतात. "Nervous", "Upset", "Mood off" - असे अनेक शब्द आपण वापरतो. मुळात दृष्टिकोन बद्दला कि अस काही नाहीच हे जाणवतं. हा दृष्टिकोन बदलवणार हे पुस्तक.

आनंदवन ला जायची एक संधी मला आली होती. मी शाळेत असतांना. पण कुठल्या कारणा मुळे मी नाही जाऊ शकली आणि माझ बाबांना भेटायचं स्वप्न मोडल. त्या नंतर ते गेले. त्यांना मी भेटू शकली नाही याची खंत आहेच.

दुसर छायाचित्र आहे माझ्या कुटुंबाच – डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या सोबत. ती वेगळीच गोष्ट होती कि मी अनेक दिवस घरच्यांवर रुसली होती. मला ना घेता परस्पर "plan" बनवून ते हेमलकश्याला गेले - लोक बिरादरी प्रकल्प बघायला. मी तेव्हा पुण्यात होते. अर्थात मला जायला आवडेलच आणि तशी संधी येताच मी प्रकल्प बघायला नक्कीच जाणार. तुम्ही हि एकदा जाऊन प्रकल्प बघावा, काय काम झाल आहे हे बघाव अशी ईच्छा व्यक्त करते.

डॉ. म्हणतात आम्ही सगळे इथे आलो ते कार्यकर्ते म्हणून. अर्थात ते खर देखील वाटतंय. 

अश्या या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी नमन करते.

(Non-Marathi readers, there’s English and Hindi translation of the book.
Second ImageWith Dr.Prakash Amte and Dr.Mandakini Amte is my family)

No comments:

Post a Comment

अहिल्याबाई होल्कर

​ इस नाम को किसी परिचय की आवश्यकता नही। यह नाम अपने आप में ही एक बहुत बड़ा व्यक्तिमतव है। पितृसतात्मकता में उभर कर आयी हुई एक साम्राज्ञी, अह...